व्हेरिकोज व्हेन्सपासून मुक्तता मिळवा

व्हेरिकोज व्हेन्सपासून मुक्तता

व्हिरिकोज व्हेन्स हा पायांना होणारा आजार आहे. हा आजार म्हणजे शिरांची एकप्रकारची पिळवणूक असून, त्यामुळे त्यांची लवचिकता हळूहळू कमी होऊन अंतिम टप्प्यात नष्ट होते. शिरांमधील व्हॉल्व्ह मागील बाजूनं काम करणं कमी करतात, म्हणजे तिथला रक्तप्रवाह खंडीत होतो. यामुळे पुढच्या बाजूनं त्या रक्त अक्षरश: मागं खेचतात. विशेषत: महिलांमध्ये व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास सौंदर्याशी निगडीत असल्यानं त्या याबाबत फारच ताण घेतात.

व्हेरिकोज व्हेन्सची कारणं

-अनुवंशिक
-सातत्यानं उभं राहून काम करण्याची पद्धत
-गरोदरपणा. गर्भनिरोधक गोळ्यांचा नियमित वापर
-वय, स्थूलपणा, पायांचं दुखणं किंवा शस्त्रक्रिया

लक्षणं

-पाय कुरूप दिसण्यास सुरुवात
-पायाला जडत्त्व येणं. सतत दुखणं.
-घोटा आणि तळपायाला सूज
-खाज आणि घोट्याजवळील त्वचेचा रंग नाहीसा होणं
-पायात चमक भरणं, मुंग्या येणं

वर उल्लेख केलेली लक्षणं ही अगदी प्राथमिक स्वरुपाची आहेत, त्याकडे वेळीच लक्ष दिलं नाही, तर ही लक्षणं गंभीर रुप धारण करतात आणि त्यांची गुंतागुंत वाढते.
-थ्रोम्बोफ्लेबिटिस : म्हणजे सुजलेल्या वाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी होणं
-व्हेरिकोज एक्झिमा किंवा डरमॅटिटिज् : त्वचा कोरडी बनते. सतत खाज सुटते. सतत त्वचा नखानं खाजवल्यानं तिथं जखम होते, रक्त येतं आणि या वेदना सहन होत नाहीत. हे व्रण जात नाहीत. थकवाही खूप जाणवतो.
-लिपोडरमॅटोस्केरोसिस : यामध्ये त्वचा रूक्ष, कडक बनते.

निदान स्पष्ट असतं; पण व्हिनोस कलर डॉपलर टेस्ट ही (शिरासंबंधित चाचणी) मूल्यांकन करणारी यंत्रणा आहे. लक्षणं दिसू लागल्यानंतर काही महिला सौंदर्यतज्ज्ञांकडून सल्ला मागतात. अनेकींच्या बाबतीत लक्षणांमध्ये गुंतागुंत दिसू लागल्यानंतरच सल्लामसलत केली जाते. पहिल्याच टप्प्यांत लक्षणं आटोक्यात आणणं शक्य आहे. यासाठी जीवनशैलीत बदल, औषधांचा वापर आणि व्हिनोस स्टॉकिंग्जचा वापर अशी उपचारपद्धती अस्तित्त्वात आहे. हा आजार वाढल्यानंतर अॅक्टिव्ह ट्रिटमेंट घेणं अत्यंत गरजेचं बनतं. हिलिंग हँड क्लिनिकमध्ये व्हेरिकोज व्हेन्सवर उपचार करण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. लेझरच्या साहाय्यानं व्हेन्सवर उपचार करणं शक्य आहे, त्यासाठी इंडोव्हेनोस लेझर अॅब्लेशन ही पद्धती वापरली जाते. यासाठी साधारणत: ३० ते ४५ मिनिटांचा कालावधी लागतो. उपचारादरम्यान आणि नंतर रूग्णाला फार कमी प्रमाणात अवघडलेपण जाणवेल. उपचाराच्या दुसऱ्याच दिवशी रूग्ण त्याचं दैनंदिन काम करायला सुरुवात करू शकतात, हे विशेष.

डॉ. परेश गांधी हे व्हेरिकोज व्हेन्समधले तज्ज्ञ असून, हिलिंग हँड क्लिनिकनं आत्तापर्यंत मोठ्या संख्येनं या उपचारपद्धतीच्या माध्यमातून रुग्णांना यशस्वीरित्या बरं केलंय.

अपॉइन्मेंटसाठी संपर्क : हिलिंग हँड क्लिनिक

  • नवी मुंबईः ८८८८१ ६६६६७
  • दक्षिण मुंबईः ८८८८२ ६६६६४
  • ढोले पाटील रॊड : ८८८८२ ८८८८४
  • पिंपरी-चिंचवडः ८८८८२ ००००४
  • बाणेरः ८८८८६ २२२२१
  • साळुंके विहारः ८८८८५ २२२२६
  • चाकणः ८८८८२ ९६६६६
  • नाशिक: ८८८८३ ६६६६२

वेबसाइट : www.healinghandsclinic.co.in
ई-मेल आयडी :info@healinghandsclinic.co.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *