बद्धकोष्ठता

बद्धकोष्ठता

मध्यंतरी एक बॉलिवूड ब्लॉकबस्टर चित्रपट आला होता. त्या चित्रपटाच्या मध्यवर्ती संकल्पनेत ‘बद्धकोष्टता’चा विषय असल्याने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन झालं खरं परंतु हा त्रास ज्यांना होतो, तेच त्याची व्यथा समजू शकतात. आतड्यांची हालाचालीत बिघाड झाला की बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू होतो. हा त्रास सुरू झाला की, साधारणपणे तुम्ही जितक्यावेळा शौचास जाता त्यापेक्षा कमी वेळा जाऊ लागता, मलविसर्जनाच्यावेळेस ताण येऊ लागतो, शौचाची जागा कोरडी होते. काहीवेळा तर मुळव्याध, फिशर, सूज येणे असा गंभीर स्वरूपाचा त्रासही होतो. पण आपण बद्धकोष्ठता ना म्हणजे ‘बिघडलेली पचनसंस्था’ असं सरळसोट विचार करून निमूट सहन करत राहतो. खरंतर उगीच असं सहन करत राहण्यापेक्षा बद्धकोष्ठतेवर उपाय करणं अधिक भल्याचं नाही का!

बहुतांशवेळा बद्धकोष्ठतेवर जे उपचार केले जातात त्यातून आराम मिळतच नाही, अशी एक ओरड असते. ते खरं आहे कारण बद्धकोष्ठता होण्यामागे निरनिराळे घटक कारणीभूत असतात आणि आपण त्यातल्या कुठल्यातरी एकाच घटकाचा विचार करून उपचार करतो. त्यामुळे आराम मिळत नाही उलट त्रास गंभीर होतो. हीच गोष्ट ध्यानात घेऊन, बद्धकोष्ठतेपासून कायमस्वरूपीचा आराम मिळवून देण्यात  ‘हिलींग हॅण्डस क्लिनीक’ बहुविध उपचारपद्धती देण्यात प्रसिद्ध आहे. हिलींग हॅण्डस क्लिनीकमध्ये पचनसंस्थाशी निगडीत आजारांवर सर्वंकष उपचार केले जातात.

आजच्या धकाधकीच्या जगण्यात आपल्या सगळ्यांचीच जीवनशैली बिघडली आहे. या बिघडलेल्या  जीवनशैलीमुळे जर बद्धकोष्ठता होत असेल तर या क्लिनीकचे संस्थापक आणि भारतातील अत्यंत नावाजलेले प्रॉक्टोलॉजिस्ट डॉ. अश्‍विन पोरवाल यांनी स्वत: एक उपचारपद्धती शोधली आहे. एमसीडीपीए असं याच उपचारपद्धतीचं नाव आहे. या उपचारपद्धतीत दोन तीन गोष्टी एकत्रित केल्या आहेत. त्यात क्लिनीकमध्येच बनविण्यात येणारे वनौषधींची रेचक औषधांसोबतच आपल्या सदोष आहारपद्धतीत बदल करण्यासाठी समुपदेशन, स्नायूंच्या बळकटीसाठी फिजियोथेरेपी आणि आयुर्वेदीक तेलमसाज अशी विविध उपचारपद्धती एकत्रित वापरून उपचार केले जातात. योग्यरितीने हे उपचार घेतल्यास त्याचा अत्यंत चांगला फायदा होतो. ज्यांना बद्धकोष्ठतेचा सातत्याने त्रास होतो त्यांच्यासाठी कोलोन हायड्रोथेरेपी ही क्लिनझींग तंत्र वापरण्यात येते. या तंत्रात तापमान व दाब नियंत्रीत पाण्याचा वापर करून पोट साफ केले जाते.

डॉ. पोरवाल यांच्यासोबत दीर्घकाळ काम करणारे डॉ. नेहल पटेल हे या उपचारांविषयी म्हणाले, ‘गंभीर त्रास होणार्‍या रूग्णांची नेमकी आणि गुंतागुंतीच्या कारणाचं निदान करण्यासाठी एमआरआय डिफेकॉग्राफी ही तपासणी केली जाते. ज्यांना शाररिक समस्या असतात जसे की गुदाशयाचा अर्ंतराळ किंवा गुदाशयच खाली सरकणे (रेक्टोसेल) किंवा मलविसर्जन न होणे अशा रूग्णांसाठी स्टारर (एसटीआरआर) सर्जरी उपयुक्त ठरू शकते. या सर्जरीने आराम मिळाल्याचं रूग्ण सांगतात. स्त्रियांच्याबाबत बद्धकोष्ठता ही मुत्राशयाशी निगडीत असते. अशा स्त्रियांना खोकताना किंवा व्यायाम करताना त्यांना लघवी होते. अशा घटनेसाठी पटेल पॉप्स (पीओपीएस) ही सर्जरी सुचवतात. विशेष म्हणजे भारतात सर्वात पहिल्यांदा ही सर्जरी ‘हिलींग हॅण्डस क्लिनीक’ने केली. या सर्जरीमुळे खाली गळलेले अवयव त्याच्या जागी पुन्हा सरकवून त्याची कार्यप्रणाली पुन्हा सुरू होते. म्हणूनच या सर्जरीने किती तरी स्त्रियांचं दुखणं कमी झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *