बद्धकोष्ठतेसाठी आता समग्र उपचार

बद्धकोष्ठतेसाठी आता समग्र उपचार

बद्धकोष्ठता या आजाराविषयी आपल्यापैकी अनेकजण मोकळेपणाने बोलत नाही, पण हा आजार खूप गंभीर स्वरुप धारण करू शकतो त्यामुळे त्यावर बोलणे किंवा उपचारात टाळाटाळ करणे योग्य नसते. प्रत्येक व्यक्तीनुसार बद्धकोष्ठतेच्या आजाराची लक्षणे वेगवेगळी असू शकतात, पण त्याबाबतची प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे आहेत.

 • १. आठवड्यातून तीनपेक्षा कमी वेळा मलविसर्जन होणे.
 • २. कडक विष्ठा (मल) – (२५ टक्के वेळा)
 • ३. शौचास जाऊन आल्यानंतरही पोट साफ न होणे (२५ टक्के वेळा)

आपल्या आहारात फळे, भाज्यांचे किंवा फायबरचे प्रमाण पुरेसे नसल्यामुळे बद्धकोष्ठतेचा आजार जडतो. मधुमेहाला कारणीभूत ठरणारी बैठ्या कामाची व शरीराला अपायकारक ठरणाऱ्या प्रोसेस्ड फूडची जीवनशैलीही बद्धकोष्ठतेला कारणीभूत ठरते.पाणी कमी प्यायल्यामुळे पोटातील आतड्यातील (कोलन) ओलसरपणा कमी होतो व त्या परिस्थितीमध्ये बद्धकोष्ठतेचा आजार निर्माण होतो. या परिस्थितीमध्ये मोठ्या आतड्यातील पाणी शोषून घेण्याचा प्रयत्न आपले शरीर करते. पाण्याच्या कमतरतेमुळे मल (विष्ठा) मऊ न राहता ती कडक होते आणि कोलनमधून सरकण्यास अडचण निर्माण होते.

बद्धकोष्ठतेच्या आजाराने ग्रस्त लोक अनेकदा लॅक्सेटिव्ह्सचा वापर करतात. त्याचा वापर करणे योग्य नसते कारण लॅक्सेटिव्ह्स म्हणजे एकप्रकारे आपल्या आतड्यामध्ये छोटा बाँब फुटण्यासारखे असते. आतड्याला त्रास देऊन मलविसर्जनाची प्रक्रिया पार पाडण्याचे काम लॅक्सेटिव्ह्स करतात. त्यामुळे आतड्यातील स्नायू कृत्रिमरित्या मलविसर्ग क्रिया करतात व आतड्याला आळशी बनवतात. या क्रियेमुळे वारंवार बद्धकोष्ठता निर्माण होते आणि लॅक्सेटिव्ह्सवरील तुमचे अवलंबन वाढते.

हिलिंग हँड्स क्लिनिकचे संस्थापक व प्रसिद्ध कोलोरेक्टल सर्जन डॉ. अश्विन पोरवाल म्हणाले, अनेक व्यक्तींना बद्धकोष्ठता म्हणजे काय आणि तो आजार आपल्याला झाला आहे की नाही याची कल्पना नसते. आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग म्हणून लोक या आजाराच्या त्रासाची सवय करून घेतात. आहार व जीवनशैलीतील बदलांनाही प्रतिसाद न देणाऱ्या ऑब्स्ट्रक्टेड डिफेकेशन सिंड्रोम (ओडीएस) म्हणजेच वारंवार बद्धकोष्ठतेच्या गंभीर स्वरुपाचा त्रास अनेक रुग्णांना होत असल्याचे आम्हाला दिसून येते. ओडीएसचे निदान करण्यासाठी असलेली एमआरआय डिफिकोग्राफी चाचणी पुण्यात पहिल्यांदाच आमच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बद्धकोष्ठतेच्या प्राथमिक टप्प्यातील अवस्थेसाठी क्लिनिकमध्ये एमसीडीपीए या उपचार पद्धतीचा वापर केला जातो. या पद्धतीमध्ये आहार नियंत्रण, फिजिओथेरपी आणि हर्बल ऑईलचा वापर केला जातो. आजाराच्या प्रगत टप्प्यासाठी स्टार (स्टेपल्ड ट्रान्स अँनल रेक्टल रिसेक्शन) शस्त्रक्रियेचा पर्याय उपलब्ध असतो. या शस्त्रक्रियेचा अवलंब वैद्यकीय क्षेत्रातच पहिल्यांदा करणाऱ्या डॉ. पोरवाल यांच्या मते रुग्णांसाठी ही उपचार पद्धती म्हणजे वरदान आहे.

बद्धकोष्ठता होऊ नये यासाठी

 • १. भरपूर पाणी व द्रव्यांचे सेवन करा
 • २. आहारात भरपूर भाज्या व फायबरचे प्रमाण ठेवा
 • ३. आहारात ओमेगा-३ चा ही समावेश करावा
 • ४. नियमित व्यायाम करा

बऱ्याचदा बद्धकोष्ठतेसह महिलांमध्ये आणखी एक आजार आढळून येतो. खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर लघवीवरील नियंत्रण सुटून लघवीचे काही थेंब बाहेर येतात. तसेच ओटीपोट जड झाल्यामुळे अपूर्ण लघवी होते व त्यामुळे वारंवार लघवीला जावे लागते. या स्थितीला पेल्विक ऑर्गन प्रोलॅप्स (पीओपी) असं म्हणतात. डॉ. पोरवाल म्हणाले, पीओपीच्या सुरवातीच्या टप्प्यात फिजिओथेरपी (किगल प्रकारचे व्यायाम) आणि बायोफिडबॅक या प्रकारच्या उपचारांनी लक्षणे कमी करू शकतो. आजाराच्या प्रगत टप्प्यात नव्याने विकसित केलेल्या पेल्विक ऑर्गन प्रोलॅप्स सस्पेंशन (पीओपीएस) शस्त्रक्रिया फायदेशीर ठरते.

अधिक माहितीसाठी भेट द्या www.healinghandsclinic.co.in किंवा संपर्क करा ८८८८२८८८८४

 • ढोले पाटील रॊड : ८८८८२ ८८८८४
 • पिंपरी-चिंचवडः ८८८८२ ००००४
 • बाणेरः ८८८८६ २२२२१
 • साळुंके विहारः ८८८८५ २२२२६
 • चाकणः ८८८८२ ९६६६६
 • दक्षिण मुंबईः ८८८८२ ६६६६४
 • नवी मुंबईः ८८८८१ ६६६६७
 • नाशिक: ८८८८३ ६६६६२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *